लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा 'या ' राजकीय पक्षात 16 सप्टेंबरला प्रवेश
Lavani Empress Surekha Punekar joins political party on September 16
आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची लवकरच राजकीय इनिंग सुरू होणार आहे .16 सप्टेंबरला त्या सोळा कलाकारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
16 सप्टेंबर पासून सुरेखा पुणेकर राजकीय फड गाजवणार आहेत. सुरेखा पुणेकर सोबत 16 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ मनगटावर बांधणार आहेत.
सुरेखा पुणेकर यांची प्रतिक्रिया :-
चित्रपट, कला ,साहित्य आणि संस्कृती विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 16 सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहे. मी आत्तापर्यंत कलेची सेवा केली. आत्ता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. मला महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत . येत्या 16 सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे .धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा